पोलीस बंदोबस्तात जनसुनावणी

टोरंटो वीज प्रकल्पाची पर्यावरणविषयक सुनावणीला विरोध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात टोरांटो कंपनीचा वीज प्रकल्प येऊ घातला आहे. या प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली. दरम्यान या जनसुनावणीत जनतेने चोहो बाजूंनी विरोध दर्शवला असून, पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात रायगड उपजिल्हाधिकारी यांनी ही सुनावणी घेतली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उप प्रादेशिक कार्यालय रायगड यांच्याकडून पर्यावरणविषयक जनसुनावणी गौरकामत येथे घेण्यात आली. कर्जत तालुक्यामध्ये टोरेंटो पीएचएस तीन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रस्तावित साई डोंगर एक (3000 मेगावॅट) ऑफ स्ट्रीम ओपन लूप उदचंद जलविद्युत प्रकल्प पीएससी) प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी सर्वे क्रमांक 27 गौरकामत येथे घेण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कर्जत तहसीलदार डॉ. धनजंय जाधव यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. जनसुनावणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठा गदारोळ या जनसुनावणीमध्ये दिसून आला. त्यामुळे बंदोबस्तात असलेले कर्जतचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले हे स्वतः जनतेत उभे राहून शांतता बाळगण्याची सूचना करीत होते. यावेळी शेतकऱ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली व त्यांचे मत मांडण्याची त्यांना पूर्णपणे मुभा देण्यात आली होती. यावेळी जिथे प्रोजेक्ट होणार आहे, तेथील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात असे अनेक शेतकऱ्यांनी आपले मत मांडले आणि संपूर्ण शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचली नसल्याने तेथील स्थानिक शेतकरी यांनी जनसुनावणी पुन्हा घ्या, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या होत नाही तोवर प्रकल्प पुढे रेटला जाऊ नये, अशी मागणी केली. त्याचवेळी कोणाच्याही दबावाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करू नये, अशी सूचना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे आमचा प्रोजेक्टला विरोध नाही, योग्य तो मोबदला आणि न्याय द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, असे अनेक मुद्दे उपस्थित केले. भाजपचे किरण ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आम्ही येथे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आलो आहोत आणि यासाठी कोणीही राजकारण करू नये आणि आपले पक्ष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. वाडवडिलांनी जपून ठेवलेली जमीन या प्रोजेक्टमध्ये जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले पाहिजे.

ही प्रायव्हेट कंपनी त्यांचं काम करण्यासाठी आली आहे आपण सर्वांनी एकत्र मिळून येथे राजकारण न करता समाजकारण करणे गरजेचे आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या 100 टक्के समाधान व्हावे यासाठी पर्यावरणविषयक शेतकरी जनसुनावणी पुन्हा घेण्याची मागणी केली. ॲड. संकेत भासे यांनी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य तो मोबदला द्या, रोजगार द्या, स्थानिक भूमीपुत्रांना नोकऱ्यांआणि आमचा शेतकरी कशा पद्धतीने सुखावेल याकडे लक्ष द्या, अशी मागणी केली. येथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजे, ही आमची मागणी आहे. कारण, या प्रकल्पातून भविष्यात कर्जत तालुक्याचा विकास होणार आहे. महालक्ष्मी देवीचा असणारा मंदिर त्याचे पुनर्वसन, महाराजांच्या काळातील किल्ला याचे संवर्धन, प्राण्यांचे संवर्धन, याकडे लक्ष देऊन हे प्रोजेक्ट केले पाहिजे, अशी मागणी केली.

Exit mobile version