| जळगाव | प्रतिनिधी |
जळगावमध्ये मंगळवारी (दि.5) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिली सभा होणार आहे.
या सभेला जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी तीन वाजता सुरुवात होईल. शरद पवार यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सभेमुळे अजित पवार गट मात्र टेन्शनमध्ये आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.