अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी तयार केलेल्या अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज (भाप्रसे) यांच्या हस्ते बुधवार दि.18 रोजी मंत्रालयात करण्यात आले.

राज्यातील वत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्टॉनिक प्रसारमाध्यांमध्ये वृत्तविषयक काम करणाऱ्या पत्रकार प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी शासनाव्दारे विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रक्रीयेची परिपूर्ण आणि विहित माहिती नसल्यामुळे पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज करताना अडचणी येतात. अपूर्ण भरलेले अर्ज आणि त्रुटींमुळे हे अर्ज नामंजूर होतात. यामुळे पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेपासून वंचित राहावे लागते, असे होऊ नये या करिता ही अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, संचालक राहुल तिडके, उपसंचालक दयानंद कांबळे, उपसंचालक, गोविंद अहंकारी, यांच्यासह कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे उपस्थित होते.

Exit mobile version