| खोपोली | वार्ताहर |
खोपोलीतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या ‘काजवा मनाचा’ आणि उर्दू साहित्यिक डॉ. सादिका नवाब यांच्या ‘फिर खिले फुल’ या गझलसंग्रहांचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेच्या अध्यक्षा, साहित्यिक उज्वला दिघे यांच्या हस्ते नुकतेच कै. र.वा. दिघे स्मारकात झाले.
याप्रसंगी कोमसापचे उपाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये, सुधा इतराज, कार्याध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, खजिनदार वामनराव दिघे, सचिव जयश्री पोळ, डॉ. सुभाष कटकदौंड, डॉ. सादिका नवाब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्वला दिघे होत्या.
प्रारंभी दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रकाश राजोपाध्ये यांनी प्रास्ताविकामध्ये डॉक्टर कटकदौंड यांच्या पुस्तकातील गजलांची योग्य ती समीक्षा केली. वामनराव दिघे यांनी डॉ.नवाब यांच्या पुस्तकाविषयी माहिती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर उज्वला दिघे यांनी दोन्ही पुस्तकातील काही गजलांना चाली लावून त्या गायल्या. दोन्ही पुस्तकाचे लेखक डॉ. कटकदौंड व डॉ. नवाब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नरेंद्र हार्डीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जयश्री पोळ यांनी शेवटी आभार मानले.
याप्रसंगी प्रा. प्रतापराव पाटील, माजी मुख्याध्यापक सूर्यकांत सरोदे, कोमसापचे सल्लागार नितीन भावे, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल रानडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संतोष वाघ, नलिनी पाटील, अनिशा बिवरे, सुप्रिया मेहेंदळे, प्रकाश सोनवणे, जयमाला जांभळे, प्रा. मुळीक, महेश निमणे आदी मान्यवर उपस्थित होते.