। खोपोली । प्रतिनिधी ।
सुखलाल नथू चौधरी यांच्या श्री सद्गुरुपुत्र या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन झाले. खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. खालापूरचे तहसीलदार अय्युब तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख वक्तेम्हणून सुप्रसिध्द साहित्यिक अरविंद दोडे हे उपस्थित होते. यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, अॅड. राजेंद्र येरुणकर, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पत्रकार गोकुळदास येशीकर यांनी आभार प्रदर्शन केले.