। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बापवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेस बापवली बौंधवाडी येथील रहिवासी प्रशांत जाधव यांचे वडील जनार्धन जाधव यांच्या स्मरणार्थ शाळेस संगणक भेट देण्यात आला. तर रोहन जाधव यांच्या कडून धोंडू जाधव यांच्या स्मरणार्थ शाळेस प्रिंटर भेट देण्यात आला. ह्या कार्यक्रमास गजानन भोसले,किसन शिगवण,परशुराम अडगावले,नागेश जाधव, महादेव जाधव श्री. श्रीवर्धनकर , श्री. पानवलकर, श्रीमती निकम तसेच बापवली,मामवली,गुळधे,निरंजन वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.