मंगळसूत्र खेचून दुकली पसार

। पनवेल । प्रतिनिधी ।

मॉर्निंग वॉक करता जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख रुपये किमतीचे मंगळसुत्र खेचुन दुकली पसार झाल्याची घटना करंजाडे परिसरात घडली आहे. तक्रारदार छाया महाडकर व त्यांचे पती नामदेव महाडकर हे मॉर्निंग वॉक करता जात असताना ॲक्सिस बँक समोरील सदाबहार नर्सरी जवळ, सेक्टर 02 ए करंजाडे, पनवेल येथे आले असता एका मोटर सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील 20 ग्राम वजनाचे 2 लाख रुपये किमतीचे मंगळसुत्र त्यांना धक्का देऊन जबरदस्तीने खेचून मोटर सायकल वरून पळुन गेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version