उरण तहसीलवर दंडात्मक कारवाई
माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ

| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील दिघोडे गावातील शेतकरी जयदेव ठाकूर यांनी माहिती अधिकारात उरण तहसील कार्यालयाकडे दिघोडे येथील शेतजमिनीमधील अवैध मातीचा भराव करून अनधिकृत कंटेनर यार्ड उभारून शेतकर्‍यांची व शासनाची केलेल्या फसवणुकीबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता उरण तहसील कार्यालयाकडून माहिती न मिळाल्याने जयदेव ठाकूर यांनी राज्य माहिती अधिकारी कोकण खडपीठ यांच्याकडे दुसरे अपील केले.

या अपिलात कोकण खंडपीठाने आदेश देऊनसुद्धा माहिती देण्यास कसूर केली व आयोगाच्या निर्णयाला न जुमानता बेफिकीर राहिल्यामुळे कोकण खंडपीठाने उरण तहसील कार्यालय जनमाहिती अधिकारी यास पाच हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.यांच्य उरण तहसील कार्यालयाकडून शेतकर्‍यांच्या तक्रारदार यांच्या अर्जाची कुठलीच दखल घेतली जात नाही. वारंवार स्मरणपत्र देऊनसुद्धा त्यांच्या अर्जाना केराची टोपली देऊन अपुरी व असमाधानकारक माहिती देत आहेत. राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांच्या निर्णयामुळे उरण तहसील कार्यालयाला दंडाच्या रूपाने एक चांगलीच चपराक बसली आहे.

Exit mobile version