सुप्रिया जेधे यांना पुण्यश्‍लोक अहिल्याबाई पुरस्कार जाहीर

| अलिबाग । वार्ताहर ।

अलिबागमधील सुप्रिया जेधे यांना महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे दिला जाणारा पुण्यश्‍लोक अहिल्याबाई देवी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण कार्यक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि.8) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत गेट वे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी होणार आहे.

जेधे यांना त्यांनी सुरभी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संविधान जनजागृती, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, राष्ट्रीय एकात्मता, फटाके विरोधी समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरण, वृक्षरोपण, महिलांसाठी सायबर सिक्युरिटी तसेच डिजिटल कार्यशाळा अभियान महिलांना विविध योजनांचे विविध कायद्या विषयी माहिती देणे इत्यादी विषयाशी कार्य गेली 20 वर्षापासून त्या करत आहेत. या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Exit mobile version