अरे बापरे! कारागृहात कैद्यांमध्ये जुंपली; भांडण सोडविणार्‍या पोलिसाला मारहाण

कारागृहात भांडण होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा काही ना काही कारणांमुळे त्यांच्यात भांडणं होत असतात. मात्र कारागृहातील हे भांडण विकोपाला गेले असून त्यामध्ये भांडण सोडविणार्‍या पोलीस हवालदारालाही मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये हनुमंत श्रीमंत मोरे हे हवालदार जखमी झाले.

पुण्यातील येरवडा कारागृहात पाच कैद्यांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस हवालदाराला पाच कैद्यांनी फरशीचे तुकडे आणि दगडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट 7 जवळ असलेल्या बराक नंबर 27 ते 31 या बराकजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी तरंग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि देवा नानासो जाधव या पाच कैद्यांमध्ये भांडण सुरू होते.

ती घटना समजताच पोलीस हवालदार हनुमंत श्रीमंत मोरे हे भांडण सोडवण्यास गेल्यावर, त्या पाच कैद्यांनी हनुमंत मोरे यांना फरशीचे तुकडे आणि दगडांनी मारहाण केली. या घटनेत हनुमंत श्रीमंत मोरे जखमी झाल्याची घटना घडली असून या घटनेचा अधिक तपास येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहे.

Exit mobile version