रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची 27.3 कोटी रुपयांना होणार विक्री

। लंडन । वृत्तसंस्था ।
रवींद्रनाथ टागोर लंडनमधील ज्या घरात राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. 2,699,500 डॉलर म्हणजेच 27.3 कोटी रुपये भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणार्‍या या इमारतीची किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. मालमत्तेच्या किंमती आणि लंडनमध्ये घर ज्या ठिकाणी आहे, ते पाहून ही किंमत फार कमी असल्याचे म्हटले जात आहे. रवींद्रनाथ टागोर 1912 मध्ये काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील ब्लू प्लाक इमारतीत राहिले होते. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2015 मध्ये लंडन दौर्‍यावर असताना राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी 2015 मध्ये लंडनच्या पहिल्या भेटीदरम्यान म्हणाल्या होत्या की, ज्या घरी टागोर राहत होते, ते घर खरेदी करण्यास आमचे सरकार उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत. ही एक खासगी मालमत्ता आहे म्हणून, मी माझे उच्चायुक्त यांना विचारले होते की आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का. त्यावेळी ही मालमत्ता विकली जाणार नव्हती, पण आता त्याची किंमत ठरवण्यात आली आहे.

Exit mobile version