सावधान! गतिरोधक बनत आहेत धोकादायक

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविलेले गतिरोधक हे नित्कृष्ट दर्जाचे बनविले होते. त्या गतिरोधक यांचे डांबर निघून गेली असून त्या ठिकाणी झालेले खड्डे हे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. दरम्यन, डिकसळ गावातील एका दाम्पत्याला त्या खड्ड्यांनी अपघातास सामोरे जावे लागले असून एक त्या अपघातात दुचाकी वर असलेल्या विवाहितेच हात फॅक्चर झाला आहे.

डीकसल गावाच्या परिसरातील सर्व गतिरोधक यांचे ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यात अनेक वाहने सतत आदळत असतात.त्यामुळे ते गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी अ‍ॅड.किशोर गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांना भेटून केली होती.ही मागणी मान्य न झाल्यास डिकसळ येथे राज्यमार्ग रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version