अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ईसाने कांबळे येथील जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले आहे. आज सायंकाळी काश्मीर येथे सीमेवर तैनात असलेल्या राहुल यांना वीरमरण आले.
राहुल यांच्या पश्चात आई वडील, भाऊ , पत्नी आणि 1 मुलगा असा परिवार आहे. 28 वर्षांचे राहुल भगत यांचे कुटुंब पत्नी आणि मुलगा ठाण्यात राहत असून आई वडील व भाऊ हे इसाने कांबळे गावात राहतात.
त्यांच्या विरमरणाने संपूर्ण जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांचे पार्थिव लष्करी इतमामात जिल्ह्यात आणण्यात येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.