राहुल बजाज : बजाज ग्रुपचा आधारस्तत हरपला; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

राहुल बजाज काळाच्या पडद्याआड
। पुणे । वृत्तसंस्था ।
दिग्गज उद्योजक राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण पूर्ण केले होते.

Exit mobile version