अलिबागमधील फेक कॉल सेंटरवर धाड; 35 जणांवर कारवाई

ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून ग्राहकांना लुटणारी टोळी सक्रिय

। आविष्कार देसाई ।

अलिबाग तालुक्यातील परहूर गावातील नेचर एज या रिसॉर्टवर रायगड पोलिसांनी छापा टाकला आहे. ग्राहकांना फेक कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 35 जणांवर कारवाई केली आहे.
सध्या पोलीस संबंधित त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्याकाही दिवसंपासून रायगड सह लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांना असे फेक कॉल येत असल्याचे बोलले जात होते. वस्तू विक्री करण्याचा बहाणा करून ग्राहकाकडून आर्थिक लूट करण्यात येत होती. यातील मास्टरमाइंड ऑस्ट्रेलिया- मेलबर्न येथे असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version