| पुणे | प्रतिनिधी |
पद्मावती भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहकारनगर पोलिसांनी सोमवारी (दि. 11) रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या पर्वती मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्मावती भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांच्या पथकाला सोमावारी रात्री मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकली असता पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस, तसेच पाच ते सहा जणांना पत्ते खेळताना पकडले. तसेच तेथून पत्ते, रोकड, तसेच अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली आहे.
जुगार अड्ड्यावर धाड; भाजप पदाधिकाऱ्यासह सहा जण ताब्यात
