। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पोहवा यशवंत झेमसे, पोह राकेश म्हात्रे, पोहसुधीर मोरे, पोह जितेंद्र चव्हाण, पोह अक्षय पाटील, पोहवा शामराव कराडे, पोशि लालासो वाघमोडे, पोशि भरत तांदळे, पोशि ओंमकार सोंडकर यांनी केली आहे. नेरळ पोलीस ठाणे येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमध्ये मटका सट्टा खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सर्व कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांना जिल्ह्यामध्ये खोपोली, नेरळ, रोहा, तळा इत्यादी ठिकाणी अवैधरित्या मटका सट्टा घेत कारवाई केली आहे.