। पनवेल । वार्ताहर ।
तायक्वांदो असोशियन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या अधिकृत संघटनेमार्फत राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमधून 480 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दि. 8 ते 30 सप्टेंबर दरम्यान लातुर जिल्हातील औसा रोड येथील क्रीडा संकुलात घेण्यात आली होती. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात 6 सुवर्णपदक, 4 रौप्यपदक आणि 7 कांस्यपदक अशी एकूण 17 पदके मिळवुन सांघिक दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच, या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पाँडिचेरी येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सुवर्णपदक विजेतेः- प्रशांत घरत, राकेश जाधव, रुपेश माळी, प्राजक्ता अंकोलेकर, मुग्धा भोसले आणि प्रशांत घरत.
रौप्यपदक विजेतेः- अक्षता भगत, गायत्री भंडारे, रतिका अहुजा आणि संदीप प्रभु.
कांस्यपदक विजेतेः- दिनेश म्हात्रे, निर्मिती दत्ता, कार्तिका नारायण (3), रूपेश माळी आणि दिनेश म्हात्रे.