जिल्ह्यात कोरोनाचे 128 नवे रूग्ण

30 कोरोनामुक्त, 629 ॲक्टिव रूग्ण
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 8 तालुक्यात 128 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दिवसभरात 30 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तब्बल 531 ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

रविवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 75, पनवेल ग्रामीण 35, उरण 4, खालापूर 2, कर्जत 4, पेण 4, अलिबाग 1, माणगाव 2, आणि श्रीवर्धन 1 असे 128 रुग्ण आढळले. तर पनवेल ग्रामीण 27, खालापूर 3, अशा एकूण 30 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 405 झाली आहे. यापैकी 2 लाख 11 हजार 078 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 इतका आहे. सद्यस्थितीत 629 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version