जिल्ह्यात 293 कोरोना रूग्ण; 228 कोरोनामुक्त

जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुरूवारी रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये 293 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 080 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 228 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गुरूवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 134, पनवेल ग्रामीण 69, उरण 9, कर्जत 11, पेण 24, अलिबाग 21, मुरुड 1, माणगाव 3, रोहा 7, सुधागड 1, श्रीवर्धन 6, म्हसळा 2, महाड 3 आणि पोलादपूर 2 असे 293 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 121, पनवेल ग्रामीण 44, उरण 6, खालापूर 3, कर्जत 7, पेण 15, अलिबाग 19, माणगाव 3, रोहा 6, श्रीवर्धन 1, महाड 2 तर पोलादपूर 1 अशा एकूण 228 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 18 हजार 264 झाली आहे. यापैकी 2 लाख 12 हजार 483 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 701 इतका आहे. सद्यस्थितीत 1 हजार 080 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version