रायगड जिल्ह्यात 145 रुग्ण; सहा जणांचा मृत्यू, 339 कोरोनामुक्त

जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शुक्रवार दि. 11 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 145 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 339 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 25, पनवेल ग्रामीण 21, उरण 2, खालापूर 8, कर्जत 4, पेण 28, अलिबाग 13, मुरुड 1, माणगाव 2, तळा 1, रोहा 4, सुधागड 2, म्हसळा 1 व महाड 23 असे 145 रुग्ण आढळले. श्रीवर्धन व पोलादपूर या दोन तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 13 हजार 840 झाली आहे. यापैकी 2 लाख 08 हजार 179 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 678 वर गेला आहे. सद्यस्थितीत 983 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version