रायगड जिल्हा बँकेचा इंदोर मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

आमदार जयंत पाटील चेअरमन असलेल्या रायगड जिल्हा बँकेचा इंदोर मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि विद्यमान खासदार सुरेश प्रभु यांच्या हस्ते रायगड जिल्हा बँकेला आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी इंदोर,मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री सतीशजी मराठे हे देखील उपस्थित होते. सदर पुरस्कार स्वीकारण्याकरिता बँकेच्या वतीने बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक हे उपस्थित होते.

Exit mobile version