रायगड जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा संपन्न

| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहा/चौदा वर्षांखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी दि. 10 एप्रिल रोजी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी अलिबाग, पनवेल, उरण, पेण, खोपोली, कर्जत तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, खारघर येथे घेण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, सदस्य नंदकुमार पालवे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पनवेल चेस असोसिएशनचे सचिव सी.एन .पाटील, सदस्य विकास घातूगडे, संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे योगेश सर उपस्थित होते. बक्षीस समारंभासाठी स्वप्निल ठीक, डव्होकेट गोपीनाथ डंगर आदि उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमित कदम, संगणक पंच श्रेयस पाटील राष्ट्रीय पंच, विकास घातूगडे, सुशील गुरव यांनी काम पाहिले. राज्यस्तरीय दहा वर्ष वयोगटाची स्पर्धा 14 व 15 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे पार पडली, तर 14 वर्ष वयोगटाची राज्यस्तरीय स्पर्धा दि. 29 एप्रिल ते 1 मे 2022 रोजी सोलापूर येथे होणार आहे. या स्पर्धेत प्रथम आलेले दोन रायगडमधील स्पर्धक भाग घेतील.

Exit mobile version