। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेले 18 दिवस सुरु असलेल्या एसटी संपामुळे रायगड विभागाला सुमारे साडेपाच कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.रायगड विभागात दररोज 400 एसटी फेर्या होतात.त्यातून सुमारे 60 हजार प्रवासी येजा करीत असत.त्यामुळे एसटीला दररोज 30 लाखांचे उत्पन्न मिळत असे.पण संप सुरु झाल्याने हे सारे उत्पन्नच बंद झालेले आहे.अशी माहिती रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी कृषीवलला दिली.दरम्यान,महामंडळाच्या आदेशानुसार विभागातील 105 रोजंदारी एसटी कर्मचार्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.त्यांना कामावर तातडीने रुजू होण्याचे निर्देश देण्यात आलेे आहेत.मात्र अद्यापपर्यंत कुणीच हजर झालेले नाही,अशी माहितीही बारटक्के यांनी दिली.