जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; शेतकरी, मच्छीमारांचे नुकसान
| रायगड | प्रतिनिधी |
पाच महिन्यांपासून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे, पण पर्जन्यमानाची सरासरी यंदा दरवर्षीपेक्षा 16 टक्क्यांनी कमी असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे एकीकडे पर्जन्यमान घटले असले तरी अतिवृष्टीने शेतकरी, मच्छीमार, पर्यटनाला मात्र फटका बसला आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसाचा आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर मच्छीमारांनाही शेवटच्या मासेमारी हंगामाचा फायदा उचलता आलेला नाही, मात्र या नुकसानीची कोणतेही मोजमाप नसल्याने आर्थिक नुकसान सोसावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात मोठे पूर आले नाहीत. मोठी नैसर्गिक आपत्ती आली नाही तरी पावसाळ्यात 523 पक्क्या घरांचे, 92 कच्च्या घरांचे, 20 झोपड्यांचे नुकसान झाले. 12 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर चार जणांचा मृत्यू झाला. तसेच पावसाने 2 हजार 185 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान केले
महिना पडलेला पाऊस सरासर
मे 454.95 14.67
जून 697.00 107.1
जुलै 763.6 63.4
ऑगस्ट 744.2 85.00
सप्टेंबर 429 104
रायगड जिल्ह्यात 97.74 टक्के पाऊस पडला.
दक्षिणेपेक्षा उत्तरेत जास्त पाऊस
यंदा दक्षिण रायगडपेक्षा उत्तर रायगडात जास्त पाऊस पडला. अलिबाग, उरण, पेण, मुरूड या चार तालक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अलिबाग तालुक्यात सरसरीच्या 111.5 टक्के पावासची नोंद झाली आहे. उरणमध्ये 116.9 टक्के, पेण तालुक्यात 101.7 टक्के तर मुरूडमध्ये 106 . 5 टक्के पाऊस पडला. पोलादपूर तालुक्यात सरासरीच्या 72.8 टक्के कमी पाऊस पडला आहे.
मॉन्सूनच्या कालावधीवरून नोंद
1 जून ते 30 सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. शासनाकडे चार महिन्यांच्या मॉन्सूनचा पाऊस म्हणून नोंद केली जाते. या चार महिन्यांमध्ये रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 148.6 मिलिमीटर आहे. जिल्ह्यात 30 सप्टेंबरपर्यंत 2626.8 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. वार्षिक सरासरीच्या 83.7 टक्के पाऊस पडला आहे. यंदा चार महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या 16 टक्के कमी पाऊस पडला आहे.







