रायगड आपलाच, कामाला लागा

अनंत गीते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

| म्हसळा | प्रतिनिधी |

रायगड लोकसभा मतदार संघातील मतदार नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. रायगड आपलाच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा शिवसेनेच्या कार्यकत्यांनी कामाला लागावे. रायगड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर रायगडचा खासदार आणि आमदार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कार्याला हवेत. असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. म्हसळा तालुका पाचगाव आगरी समाज सामाजिक सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पक्ष नेते अनंत गीते बोलत होते.

शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वूमीवर म्हसळा तालुका शिवसेना कार्यकर्त्यां जवळ संवाद मेळाव्यातून संवाद करताना आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शिवसैनिकांनी आता कामाला लागा असे आदेश देत रायगड लोकसभा निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार असल्याचे जाहीर करताना श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जिल्हा प्रमुख अनिल नवगणे हेच असतील असे जाहीर केले. या मेळाव्यात जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, उपजिल्हाप्रमुख नंदु शिर्के, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, कृष्णा म्हात्रे, जिल्हा अधिकारी चेतन पोटफोडे, सुधाकर ढाणे, महीला प्रमुख सायली सुगदरे, स्वाती घोसाळकर, दिलीप करंदीकर, विभाग प्रमुख गजानन शिंदे, संघटक अमित महामुणकर,अनिल महामुणकर, दिपल शिर्के, राजाराम तीलटकर, महीला आघाडी प्रमुख रिमा महामुणकर, उपप्रमुख निशा पाटील, नगरसेविका राखी करंबे, अजय करंबे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version