अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनने नुकतेच झालेल्या महाड येथील पूरग्रस्त भागात जाऊन सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन धान्य व कपड्यांचे वाटप करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. आठवडाभर कोसळणारा पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे महाडसह बाजुच्या गावांचे आतोनात नुकसान झाले असून तसेच परीसरातील गावांमध्ये पुर परिस्थिति निर्माण होऊन येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरात पूराचे पाणी घुसुन नुकसान झाले आहे. येथील ग्रामस्थांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.महाराष्ट्रभर सगळीकडे पुरजन्य परिस्थिति निर्माण झाली असून सगळी कडुन मदतीचा ओघ सुरु आहे.
रायगड फोटोग्राफर आणि व्हिडीओ असोसिएशनने पूरग्रस्तांना देऊन मदतीचा हात दिला आहे.सरकार कडुन मदत मिळेलच पण त्या आगोदर पूरग्रस्तांचे हाल होऊ नये म्हणुन रायगड फोटोग्राफर असोसिएशन कडुन महाड येथील 200 कुटुंबांना वाटप रायगड फोटोग्राफर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे सचिव समीर भायदे,खजिनदार जितेंद्र मेहता,अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष योगेश राऊत, राकेश दर्पे, पेण अध्यक्ष समाधान पाटील, विनायक पाटील,प्रकाश माळी, प्रफुल्ल म्हात्रे, मंदार पाठारे, गोविंद सांवत, नितीन पाटील, निलेश शिर्के तसेच रायगड फोटोग्राफर सदस्य उपस्थित होते.