शिरढोणमध्ये रायगड प्रीमिअर लीगचे सामने रंगणार

। जेएनपीटी । वार्ताहर ।
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पावनभूमी असणार्‍या शिरढोण येथिल भव्य आद्यक्रांतीविर मैदानावर रायगड प्रीमिअर लीग हि क्रिकेटची भव्य स्पर्धा मंगळवार (दि.2) पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत चालणार्‍या या भव्य स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 क्रिकेट संघात अत्यंत चुरशीच्या क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे.
रायगड प्रीमिअर लीग ही रायगड मधिल सर्वात मोठी व नावाजलेली स्पर्धा ओळखली जाते. दि.2 नोव्हेंबर पासून या भव्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 32 नामवंत क्रिकेट संघ यामध्ये खेळणार असून क्रिकेट रसिकांना चुरशीच्या क्रिकेट सामान्यांचा थरार शिरढोणच्या क्रांतिवीर मैदानावर अनुभवता येणार आहे.
या भव्य स्पर्धेतील विजेत्यांना 3 लाख व भव्यचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्याना 2 लाख व भव्य चषक तसेच तृतीय विजेत्यास 1 लाख व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे इतर पाच तुल्यबळ संघांना प्रत्येकी 50 हजारांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर मालिकाविराला स्पोर्ट बाईक बक्षीस रुपात मिळणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना आधुनिक स्पोर्ट सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे.

Exit mobile version