| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीत रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा 2 धावांनी पराभव करत आपली आगेकूच कायम राखली आहे.
सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्सचा सलामीचा फलंदाज विकी ओस्तवाल 8 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दोनवेळा पावाने हजेरी लावली. आधी 19 तर नंतर हा खेळ प्रत्येकी 10 षटकाचा करण्यात आला. रायगड रॉयल्स संघाने 10 षटकांत 3 बाद 93 धावा केल्या. सिद्धेश वीरने 23 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याला दिग्विजय पाटील 16, नीरज जोशी 12, ऋषभ राठोडने नाबाद 11 धावा काढून साथ दिली.
लक्षाचा पाठलाग करताना सातारा वॉरियर्स संघाला 10 षटकांत 8 बाद 91 धावाच करता आल्या. पवन शहा (3), ओम भोसले (4), सौरभ नवले (9) हे झटपट बाद झाले. हर्षल काटेने एकाबाजूने लढताना चेंडूत धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. रायगड रॉयल्सकडून तनय संघवीने 3 बळी तर, शुभम कदम, निखिल कदम व सागर जाधव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.