राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी रायगड संघाची निवड

Guy holding tennis racket and ball on clay court. Boy getting ready for a serve in tennis.

। म्हसळा । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व सांगली जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 8वी सबज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ऑफिसर क्लब सांगली येथे 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. प्राविण्य प्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड चाचणीतूनही काही खेळाडूंची निवड करण्यात आली असून जिल्हा संघाची घोषणा रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल उपमहापौर सिता पाटील, सचिव स्वप्नील वारांगे, खजिनदार हेमंत पयेर यांनी जाहीर केली.

सबज्युनिअर मुले :- राज बिस्वाद, स्पर्श पाटील, प्रकाश गौतम, आरव टोंक, सिद्धेश कारंडे
सबज्युनिअर मुली :- इरा अयथान, श्रुती बोने, साक्षी बोने, दिक्षा वाळवे, कीर्ती आसवले

Exit mobile version