। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 9वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा 6 ते 9 जानेवारी दरम्यान जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस संघाच्या निवड चाचणीचे आयोजन दि 25 डिसेंबर रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे करण्यात आले होते. यावेळी रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल नगरसेविका सिता पाटील, सचिव स्वप्नील वारांगे, खजिनदार हेमंत पयेर, स्पर्धा प्रमुख मंदार मुंबईकर उपस्थित होते. या निवड चाचणीतून निवड झालेले प्राविण्य प्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सिनिअर पुरुष :- अश्विन प्रभू, आरूष निट्टुरे, निशांत गायकवाड, यशपाल चौधरी, नारायण सब्रमणी, सिद्धेश कारंडे, आकाश कदम, यश वारके
वरिष्ठ गट महिला :- प्रतीक्षा शेरकर, दिक्षा वालवे, काजल मंडळ, श्रावणी केसकर, श्रुती बोणे, फाल्गुनी ढकोलिया