लगोरी, रस्सीखेच आणि बाहुबली स्पर्धा ठरल्या आकर्षण
| अलिबाग | प्रतिनिधी |
क्रिकेट आणि कबड्डीच्या युगात लगोरी, रस्सीखेच, बाहुबली, सायकल आणि धावण्याच्या स्पर्धांनी अलिबाग क्रीडा महोत्सवात रंगत आणली. सलग दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात क्रीडा क्षेत्राचे जीवनातील महत्व बियु फाऊंडेशनने संपूर्ण रायगडकरांसमोर ठेवले. मॅरेथॉन, लगोरी, रस्सीखेच आणि बाहुबली या स्पर्धा अलिबाग क्रीडा महोत्सवाच्या आकर्षण ठरल्या. दोन दिवसाच्या महोत्सवामध्ये हजारो खेळाडू आणि क्रीडा रसिकांनी अलिबाग महोत्सवात आपली हजेरी लावून महोत्सवाला दाद दिली.
अलिबाग क्रीडा महोत्सवाला पहिल्या दिवशी सकाळी वाळूतील सायकल स्पर्धेने सुरुवात झाली. अलिबागच्या माजी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, यतीन घरत यांच्या हस्ते या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या स्पर्धेमध्ये महिलांच्या खुल्या गटात मनीषा माने प्रथम, पायल धनगर द्वितीय, चैताली शिलधणकर तृतीय आणि साक्षी शिंदे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. पुरुषांच्या खुल्या गटात प्रांजल पाटील प्रथम, देवर्षी पाटील द्वितीय, निकेत पाटील तृतीय आणि चेतन नेमनयांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.
सायंकाळी अलिबाग क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पीएनपी शैक्षणिक संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अपेक्षा कारेकर, अमोल कारेकर, आरसीएफ प्रशासनाचे व्यवस्थापक संजीव हर्लीकर , जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, गेल व्यवस्थापनाचे संचालक अनुप गुप्ता, व्यवस्थापक जतीन सक्सेना, व्यवस्थापक वीरेंद्र कुमार, निर्मल सेल्सचे राहुल पाटील, रोहन पाटील , माजी नगरसेविका वृषाली ठोसर , माजी नगरसेवक प्रदीप नाईक, प्रीती झुंजारराव, पीएनपी शैक्षणिक संस्थेचे संचालक विक्रांत वार्डे, चंद्रकांत वाजे , शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा सेने प्रमुख अमीर
उर्फ पिंट्या ठाकूर, डॉ. विनायक पाटील, मिस्टर इंडिया प्रतीक पांचाळ, मिस्टर इंडिया रोहन कदम आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर महिलांचे कबड्डी आणि बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स क्लब पनवेल प्रथम, भिलेश्वर क्रीडा मंडळ किहीम द्वितीय, ऋतुजा स्पोर्ट्स क्लब पेण तृतीय आणि प्रतिज्ञा क्रीडा मंडळ बांधण यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू रुपाली जाधव, उत्कृष्ट चढाई धनश्री ठाकूर , उत्कृष्ट पकड आंबेकर आणि पब्लिक हिरो म्हणून ऋचा भागात हिला सन्मानित करण्यात आले. बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये मरीआई मेटपाडा प्रथम, अँजेल स्पोर्ट्स सुतारपाडा द्वितीय आणि सुभान इलेव्हन अलिबाग या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज मरीआई मेटपाडा संघाचा वरुण, उत्कृष्ट गोलंदाज सुभान इलेव्हन संघाचा राहुल आणि मालिकावीर म्हणून एंजेल स्पर्ट्स सुतारपाडा या संघाचा ऋषभ याला सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात रायगड पोलीस लक्ष्मण दरवडा प्रथम, स्वराज पाटील द्वितीय, सर्वेश पाटील तृतीय आणि रामू पारधी या धावपटूंनी चतुर्थ क्रमांक पटकावला. महिला खुला गटामध्ये कोमल खांडेकर प्रथम, आदिती पाटील द्वितीय, पौर्णिमा म्हात्रे तृतीय आणि पूर्व नाईक या महिला धावपटूने चतुर्थ क्रमांक पटकावला. 40 वर्षावरील मॅरेथॉनच्या पुरुष खुल्या गटात नाथा गिरणेकर प्रथम, महेश नवगावकर द्वितीय, सचिन पत्रे तृतीय आणि मिलिंद शिळधणकरयांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात वर्ष पाटील प्रथम, तृप्ती म्हात्रे द्वितीय, ज्योती घरत तृतीय आणि कविता फुलगावकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. सायंकाळी महिलांची लगोरी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत रायगड जिल्हा लगोरी असोसिएशन प्रथम, कुलाबा क्रीडा प्रबोधिनी अलिबाग द्वितीय, कोहिनुर लायन्स अलिबाग तृतीय आणि सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कुल अलिबाग या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. यानंतररस्सीखेच स्पर्धेला सुरुवात झाली आणि क्रीडा रसिकांच्या जल्लोषाला पारावार उरला नव्हता. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा रसिकांनी घोषणांनी अलिबाग क्रीडा महोत्सवाचे मैदान दणाणून सोडले.
या स्पर्धेत महिलांच्या गटातील अंतिम सामान्याने क्रीडा रसिकांची उत्कंठा सीगल पोहचविली होती. ओएसवाय पॅन्थर प्रथम , प्रिझम संस्था द्वितीय आणि ओएसवाय वॉरियर्स या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये कुलाबा क्रीडा प्रबोधिनी अलिबाग प्रथम, जय बजरंग बेलकडे द्वितीय आणि रायगड कॉप्स अलिबाग या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या गटातील सर्वच सामने दिलखेचक होते. यामुळे प्रेक्षकांनी रस्सीखेच स्पर्धेचा आनंद लुटला. अलिबाग क्रीडा महोत्सवाची सांगता क्रॉस फिट म्हणजेच बाहुबली या स्पर्धेने झाली. हा खेळ नक्की काय असणार त्यामध्ये कोणते नियम असणार, स्पर्धकाला कोणत्या परीक्षेला सामोरे जावे लागणार हे जाहीर केले नव्हते. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहचली होती.
आयोजकांनी खेळाचे नियम आणि द्याव्या लागणाऱ्या परीक्षेचा नमुना स्पर्धकांसमोर सादर केला आणि स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये महिलांच्या गटात काजल जैन प्रथम, सुप्रिया चिमणे द्वितीय आणि भूमी म्हात्रे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर पुरुषांच्या गटात प्रसाद कावरा प्रथम, प्रथम साळुंखे द्वितीय आणि ऋषिकेश राऊत या खेळाडूने तृतीय क्रमांक पटकावला. वैजयी स्पर्धकांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.