पावरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश

| अलिबाग | वार्ताहर |
पनवेल-केरळ येथील अलिपुझाच्या राष्ट्रीय क्लासिक पावरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे खेळाडू महाराष्ट्र राज्य संघातून सहभागी झाले होते. या खेळाडूंना पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये अमृता भगत यांनी सिल्व्हर मेडल, विनायक पाटील यांनी मास्टर स्पर्धेत ब्राँझपदक, कुणाल पिंगळे यांनी बेंचप्रेस स्पर्धेत सिल्व्हर मेडल, तर राजेश अंगद यांनी मास्टर स्पर्धेत बेंच प्रेस या स्पर्धेत ब्राँझ पदक प्राप्त केले आहे. या यशाबाबत रायगड जिल्हा पावरलिफ्टिंगचे अध्यक्ष गिरीश वेदक, सेक्रेटरी अरुण पाटकर, सचिन भालेराव (सह सेक्रेटरी), राहुल गजरमल आणि संदीप पाटकर यांच्यासह रायगड जिल्हा संघटना सल्लागार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version