| पनवेल | वार्ताहर |
हरिवंश ताना भगत स्टेडियम रांची झारखंड येथे वाको इंडिया कॅडेट आणि जुनियर नॅशनल किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये एकूण 28 राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान प्राप्त करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेसाठी संस्थेचे इंडिया अध्यक्ष सुरेश अग्रवाल झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांकाचा चषक देण्यात आले.
महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष .निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रायगडचे अध्यक्ष सुधाकर घारे ,जीवन ढाकवळ, दीपेश सोलंकी सर तसेच पनवेलमधून इंडियन मार्शल आर्टस्शितो-रियो फेडरेशनचे उपाध्यक्ष व वाको इंडिया किक बॉक्सिंग असोसिएशनचे राष्ट्रीय प्रशिक्षक शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्या दशरथ पाटील व पियुष नाना धायगुडे यांनी क्रिएटिव्ह फॉम वेपन्स मध्ये रौप्यपदक मिळविले. ऋतुजा माळी,सोनाली केवत, धनश्री डाखोरे हे पण पदकांचे मानकरी ठरले. या स्पर्धेत दक्षता मंगेश जोशी -सुवर्ण, रौप्य, क्षितिजा साळवी- सुवर्ण, कांस्य उमंग गणेश तांडेल, रौप्य, कांस्य, सौम्या पिंपले- रौप्य, कांस्य , सोनिया खोब्रागडे- रौप्य, हर्ष जोशी-कांस्य, मनिष म्हात्रे-कांस्य, हंसिका मोकल- कांस्य , अरोही चव्हाण सहभाग पत्र प्राप्त केले.






