। पुणे । प्रतिनिधी ।
बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने 3 सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 6 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची आहे. त्यासाठी या भागात यलो अलर्ट जारी केला आहे.