कडाक्याच्या थंडीत पावसाचा इशारा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला होता. दरम्यान, काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हिमवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर डोंगराळ राज्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हिमाचल उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसह अनेक भागात 15 जानेवारीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पूर्वेकडील राज्यात बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नाशिकमध्येही किमान तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळणार आहे. या महिन्यात तापमानात मोठी घसरण झाली आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, विशेषत: उत्तर-पश्‍चिम जम्मूमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या काही भागात दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. जम्मू आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ येऊ शकते.

Exit mobile version