कडाक्याच्या थंडीत राज्यात पावसाचा इशारा

| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. यंदा तर अगदी हिवाळा सुरू होईपर्यंत पाऊस पडत होता. परिणामी, हिवाळादेखील जास्त दिवस राहणार, असा अंदाज लावण्यात आला आहे. तर नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान मराठवाड, विदर्भ व परिसरात हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 25 जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे मुख्य कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

Exit mobile version