। बोर्लीपंचतन । प्रतिनीधी ।
गेली तिन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसा मुळे बोर्लीपंचतन बाजार पेठ मंदावली आहे. या परिसरतीती खुजार, दांडगुरी, कार्ले, दिवेआगर, शिस्ते, वडवली वेळास परीसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतकऱ्याच्या दाढी पाण्यात बुडल्या होत्या तर शिस्ते येथे पाणि साचून राहील्याने रविवारी जवळ जवळ दोन तास वहातुक ठप्प झाली होती.
पाण्याचा निचरा होण्यासाठी सार्वजनीक बांधकाम खात्याने च्याकॉप झालेल्या मोऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे राकेश तोडणकर यांचे म्हणणे आहे. शिस्ते गावाजवळील ब्रिज जवळील रस्त्यावर पावसा मुळे दर वर्षी पाणीच पाणि साठते पण या वर ठोस उपाय योजना सार्व जनिक बांधकाम खात्याकडून केली जात नाही. हे येथील जनतेचे मोठे दुख आहे. यशवंत खारी मध्ये देखील पावसा मुळे पाणिच पाणी झाल्याने जवळ दोनशे हेक्टर शेत जमीन पाण्या खाली बुडाली होती, शेतकर्यांवर चिंतेचे वातावरण पसरले दिसत होते.

पावसाच्या दमदार सुरुवातीने गेल्या दोन तिन दिवसात जन जिवन विस्कळीत झाले आहे. अजुन पुढे तिन महीने पाउस पडणार आसल्या मुळे पुढे कसे होणर याची चिंता, आणि प्रश्न जनते पुढे आत्ताच निर्माण झाल्याचे स्पष्ट मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.