राज ठाकरे-आशिष शेलार भेट, तासभर चर्चा

मुंबईतील 6 जागांसाठी भाजपची रणनीती काय?


| मुंबई | प्रतिनिधी |

भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट झाली. आशिष शेलार दिल्लीचा निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला, मुंबईतील 6 जागांसाठी भाजपची रणनीती काय? यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि मनसेची युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थावर यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मनसे आणि भाजपमध्ये हातमिळवणी करण्यासाठीची चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाली. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चा रंगल्या आहे. मनसे महायुतीतील नवा भिडू ठरणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

Exit mobile version