। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तेजस डाकी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या युवकांचा, जेष्ठ नागरीक तथा महिला भगिनींचा सन्मान करण्याचा व्रत आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अंगीकारला आहे. चिरनेर गावातील सुपुत्र तथा उरण, नवी मुंबई परिसरातील उत्स्फूर्त समालोचक राजेंद्र भगत यांच्या सामाजिक, निस्वार्थी कार्याची दखल सामाजिक कार्यकर्ते तेजस डाकी यांनी घेऊन गौरा उत्सवाचे औचित्य साधून तथा राजेंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त घड्याळ भेट देऊन त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी नवीमुंबई येथील मुर्तीकार संतोष चौलकर, मनोहर म्हात्रे, जगन्नाथ भगत, रविंद्र भगत, जीवन नारंगीकरांसह इतर मान्यवर उपस्थित होते.