। उरण । प्रतिनिधी ।
उरणमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती रविवारी (दि.22) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, विद्यालयाचे अध्यक्ष अरुण जगे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. पालखी मिरवणुक विद्यालयाचे लेझीम पथक, ढोल ताशा, बँड पथक आणि कर्मवीरांच्या जयघोषाने संपूर्ण जासई गावातून फिरविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या पालखीचे पूजन केले. या पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष डी.आर.ठाकूर, नरेश घरत, रघुनाथ ठाकूर, सुभाष घरत, यशवंत घरत, रजनी घरत, रमेश पाटील, नुरा शेख, टी.टी. घरत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.