चिरनेरच्या ऐतिहासिक भूमीत रजनी क्रिकेट

। चिरनेर । वार्ताहर ।
तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावात काँग्रेस आय कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी चिरनेर, भोम आणि धाकटेभोमच्या वतीने, सालाबाद प्रमाणे यावर्षीही रजनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नियोजित क्रिकेट सामने 21 ते 24 मार्च या कालावधी चिरनेर येथे तयार करण्यात आलेल्या मातोश्री मैदानावर खेळविले जाणार आहेत. क्रिकेट स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून टेनिस क्रिकेटचा महासंग्राम येथे क्रिकेट प्रेमींना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.

विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक 150000 रुपये व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 75000 रुपये, व भव्य चषक तृतीय पारितोषिक 35000 रुपये व भव्य चषक, चतुर्थ पारितोषिक 35000 रुपये व भव्य चषक अशा स्वरूपाची बक्षिसे आहेत. याशिवाय मालिकावीर बाईक, उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकास सायकल देण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version