| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावात काँग्रेस आय कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी चिरनेर भोम व धाकटे भोम यांच्या वतीने, सालाबाद प्रमाणे यावर्षीही रजनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित क्रिकेट सामने 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधी दरम्यान, चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या ऐतिहासिक भूमीत, चिरनेर येथे तयार करण्यात आलेल्या मातोश्री मैदानावर खेळविले जाणार आहेत. क्रिकेट स्पर्धेचे हे नववे वर्ष असून, उरण तालुक्यातील ही मानाची प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा असून, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम येथे क्रिकेट प्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. विजेत्या संघांना मानाचा 2024 चा. स्व. बाजीराव (आण्णा) परदेशी स्मृती, चिरनेर तिरंगा चषक प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान क्रिकेट स्पर्धेची प्रवेश फी 18,000 रुपये असून, प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपये व भव्य चषक द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये, व भव्य चषक तृतीय पारितोषिक 35,000 रुपये व भव्य चषक चतुर्थ पारितोषिक 35,000 रुपये व भव्य चषक अशा स्वरूपाची बक्षिसे आहेत.
याशिवाय मालिकावीर बाईक, फलंदाज सायकल, गोलंदाज सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नामांकित पंच व उत्कृष्ट समालोचक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी क्रिकेट संघांनी राजेंद्र भगत 8422025930, 9892139418, अलंकार परदेशी 9987010600, महेंद्र ठाकूर 9594831987, सचिन घबाडी 9987012351, किशोर केणी 8452936977 व रवी भगत 9404220511 यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.