नागोठण्यात पोलिस, पत्रकारांचे रक्षाबंधन

| नागोठणे | वार्ताहर |

राजस्थानमधीन माउंटआबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय या अध्यात्मिक संस्थेच्या ब्रम्हाकुमारीज सोशल अ‍ॅक्टीव्हीटी ग्रुप तर्फे नागोठणे पोलिस ठाण्यात पोलिस व पत्रकार बांधवांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला नागोठणे केंद्रातील मंदा, पुनम, उषा जाधव राजश्री टके, सहाय्यक फौजदार दयानंद ठाकूर, ,जयेंद्र पाटील, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील, बी.डी. भायदे, सचिन भोईर, गंगाराम दुमने, राहुल पाटील, नयन रसाळ, सत्यवान पिंगळे, निशांत पिंगळे, सारिका मात्रे, प्रतिक्षा गायकवाड, ज्योती भोईर, नम्रता आयर आदी उपस्थित होते.

Exit mobile version