रोहा सेंट्रल अध्यक्षपदी राम नाकती

। कोलाड । वार्ताहर ।

रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या सन 2023-24 व 2025 या सालाकरिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले रामचंद्र नाकती यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, सचिवपदी विजय दिवकर आणि खजिनदारपदी राकेश कागडा यांची 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीसाठी रोटरी क्लब रोहा सेंटर यांच्यावतीने निवड करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रिडा, सांस्कृतिक तसेच बिल्डिंग व्यवसायिक क्षेत्रात अग्रेसर असलेले रामचंद्र नाकती हे गेली चार वर्षापासून रोटरी क्लब रोहा सेंट्रल मेंबर असून त्यांनी त्यांच्या माध्यमातुन शहरी आणी ग्रामीण भागात विविध प्रकारचे उत्तम उपक्रम राबविले आहेत. त्या अनुषंगाने रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांच्यावतीने यांची निवड करण्यात आली असून त्यांचे रोटरी क्लब रोहा सेंट्रल तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version