21 विद्यार्थ्यांचा प्रवेश
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील रामाचीवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा यापुढे कधी बंद होणार नाहीए असा विश्वास कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौड यांनी व्यक्त केला. 2017 मध्ये कमी पटसंख्येच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती, मात्र स्थानिक आदिवासी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आल्यानंतर सोमवार दि.10 जुलै रोजी सुरु झाली आहे.
2015 मध्ये पहिली आणि नंतर 2016 मध्ये दुसरी इयत्ता बंद करण्यात आल्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये कमी पटसंख्येचें कारण पुढे करून पुर्णपणे बंद करण्यात आली होती. सात विद्यार्थी संख्या असल्याने जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आली. या सहा वर्षाच्या कालावधीत रामाचीवाडी गावातील विद्यार्थी हे अंजप गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जायचे. स्थानिक ग्रामस्थ भालचंद्र थोरवे यांनी निवेदन दिल्यानंतर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौड यांनी पुढाकार घेतल्याने सोमवारी शाळेचे उदघाटन करण्यात आले.
पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत 21 विद्यार्थ्यांची पटसंख्या झाली. त्यात पहिली इयत्तेत चार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. शाळेचे उदृघाटन प्रसंगी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौड, भालचंद्र थोरवे, सुदाम मिणमिने, अरुण पारधी, रवी काजळे, छगन मेंगाळ, रोहिदास पवार, शिवकन्या सदानंदे, उपेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाचे एका महिन्याच्या 25 दिवसांचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. तर पायाभूत साक्षरता मधील शासन निर्णय यांची अंमाबजावनी यासाठी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या सेविका, मदतनीस तसेच, पहिली ते तिसरी पर्यंतचे सर्व शिक्षक यांचे प्रशिक्षण याच महिन्यात घेतले जाईल. आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी यांना किमान वाचता आले पाहिजे हे 2027 पर्यंत चे लक्ष्य देशाचे आहे. आपण हे लक्ष्य याच वर्षी दिवाळी मध्ये गाठणार असल्याचे स्पष्ट केले.