| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या काही महिन्यांपासून देशाता फुटबॉलची क्रेझ वाढल्याचं दिसतंय. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री सध्या चांगलाच चर्चेत आहे. छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच सॅफ चॅम्पियनशिप जिंकली. कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत फायनलमध्ये दणदणीत विजय नोंदवला. भारताने विजय मिळवल्यानंतर हजारो उपस्थितांनी एकसुरात वंदे मातरम गाण्यास सुरूवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मी देशासाठी चांगलं काम करण्यास प्रेरित आहे. ज्या दिवशी मला वाटणार नाही त्या दिवशी मी निघून जाईन. असे वक्तव्य केले आहे. भारतीय संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषकही जिंकला होता. त्यावेळी देखील सुनील छेत्री याने भारताला अतितटीच्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. सुनील छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 92 वा गोल मारून मेस्सी आणि रोनाल्डोचा पाठलाग करतोय. अशातच आता सुनील छेत्रीने असं वक्तव्य केलंय, जे ऐकून देशाभिमानाने ओतप्रोत भरलेला आत्मविश्वास जागा झाल्याशिवाय राहणार नाही.
जेव्हा देशासाठी माझं सर्वोत्तम देण्याचा विचार येतो तेव्हा मी मेस्सी आणि रोनाल्डोला मागे टाकू शकतो. मला सध्या खूप बरं वाटत आहे आणि मी देशासाठी चांगलं काम करण्यास प्रेरित आहे. ज्या दिवशी मला वाटणार नाही त्या दिवशी मी निघून जाईन. पण हे कधी होईल माहीत नाही.
सुनील छेत्री, फुटबॉल संघ कर्णधार