| माणगाव | वार्ताहर |
माणगाव येथील आदर्श शिक्षिका सायराबानू वजीर चौगुले यांच्या मातोश्री रमेजा अजीज जमादार यांचे रविवारी (दि.18) बहे, ता. वाळवा, जि. सांगली येथे अल्पशा आजराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांच्या निवासस्थानी येऊन अनेकानी अंत्यदर्शन घेतले. जमादार यांच्यावर बहे गावातील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. त्यावेळी अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सायराबानू चौगुले यांना मातृशोक
