| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणेचे डेप्युटी जनरल मॅनेजर- एच.आर.(कॉर्पोरेट अफेअर्स), साहित्यिक, कवी रमेश प्रभाकर धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि.5) आदर्श पतसंस्था सभागृह, आदर्श भवन, जगे उद्यानासमोर करण्यात येणार आहे.
सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या या पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार, कवी ए.के. शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. रमेश धनावडे यांचे हे चौथे पुस्तक आहे. यापूर्वी त्यांची मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले आहे. तसेच दिवाळी अंकांमधून कथा, लेख, कविता लेखन केले आहे. त्यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशक साहित्य संपदा समूह असून, या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन धनावडे कुटुंबाने केले आहे.