लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

| लातूर | वृत्तसंस्था |

लातूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार आणि बलात्कारांच्या घटना ताज्या असतानाच लातूरच्या औसा तालुक्यात वीस वर्षीय मुलीला लग्नाचे दाखवून एका 23 वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुली सोबत जवळीक साधली आणि यात पीडित मुलगी 7 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version